स्याह तरंग

तानाशाही नको म्हणणारे,
स्वतःच तानाशाह बनायला लागले.

मदतीचा हात देऊ म्हणणारे,
आज हात-पाय मोडायला निघाले.

जनतेचे नौकर ते,
जनतेला नौकर बनवायला लागले.

टाकून सामान्यांचा आयुष्य अंधारात,
दीपोत्सव साजरा करायला निघाले.

जनतेच्या जीवनाची रंगरांगोटी करून,
नवे रंग उधळायला लागले.

ओळख जुन्या हिरावून घेणारे,
नवे नाव द्यायला निघाले.

                   -✒️अमित♾️

टिप्पण्या

  1. आजची परिस्थिती आणी अप्रत्यक्ष तानाशाहीचे वर्णन अतिशय सुंदर भाषेत वर्णिली आहे, तुम्ही ............✍👌

    उत्तर द्याहटवा
  2. आजची खरी परिस्थिती तुम्ही अतिशय प्रखर शब्दात मांडली आहे. ✍👌🤟

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साकळं... भाग-1