साकळं... भाग-1
साकळं.... भाग-1 सर्वत्र अंधार पसरला होता. त्या अंधाराला चिरत राज आपली वाट काढत होता. वाट नेईल त्या दिशेने तो चालत होता. कुठे जायचे अन् कुठे नाही ? त्याला काही सुचत नव्हते. त्याचा शरीर खूप थकला होता. रानवाटेत एका वटवृक्षाचा आधार घेऊन तो बसला. सकाळपासून पोटात अन्नाचा एक कण सुद्धा गेला नव्हता. क्षीण झालेल्या तणा-मनानं आकाशातल्या चांदण्यांकडे डोळे टवकारून तो बघत होता. "काय दोष होता माझा ? का हा भोग माझ्या नशिबाला आला ? का ? का मला असा जन्म मिळाला ?" राहून-राहून त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. आत्महत्या ! होय. आत्महत्या . "जगू तरी कोणासाठी ? कोण आहे माझा ? आई ? वडील ? बहिण-भाऊ ? कोण आहे ? .... कोणीही नाही." घरच्यांची आठवण करत तो बसला होता. "का रडतो मी त्याची आठवण करून ? कोण होतो मी त्यांच्यासाठी ?...